Home ब्रेकिंग न्यूज Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा” – डॉ. मोहन भागवत

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा” – डॉ. मोहन भागवत

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा” – डॉ. मोहन भागवत
nitin gadkari & mohan bhagvat

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख”; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार

सत्ता नव्हे, तर ‘सेवा’ हेच आता राजकारण”; गेटवे ऑफ इंडियावर नितीन गडकरींचे प्रतिपादन

भारत जगाचा आधारस्तंभ: डॉ. मोहन भागवत

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित ‘कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात’ बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जागतिक शांततेसाठी भारताच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की, “सध्या जगभर मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू असून जग अस्थिर झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ एक सुदृढ आणि सक्षम भारतच जगाचा आधार बनू शकतो. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल आणि विशेषतः आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल.”

https://prahaar.in/2026/05/02/first-tribal-university-to-be-established-in-vidarbha-the-countrys-first-tribal-university/

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख

डॉ. भागवत यांनी आदिवासी संस्कृतीचा गौरव करताना सांगितले की, या समाजाने वर्षानुवर्षे आपली मूळ संस्कृती जपून ठेवली आहे. “आदिवासी समाजाची अस्मिता हीच आपल्या देशाची ओळख आहे. आपली वेद-संस्कृती जंगलांमध्येच जन्मली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. सेवा करणे हा उपकार नसून ते आपले कर्तव्य आहे. ही ‘शिवभावे जीवसेवा’ आहे, जी आपल्याला माणूस म्हणून घडवते. दया दाखवण्यापेक्षा संवेदनेने आणि कठोर परिश्रमाने दुर्गम भागात शिक्षणाचा प्रसार करणे हीच खरी देशसेवा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

राजकारण आता समाजसेवेचे माध्यम: नितीन गडकरी

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणाच्या बदलत्या व्याख्येवर भाष्य केले. ते म्हणाले, “आता सत्ता मिळवणे किंवा ‘पॉवर पॉलिटिक्स’ करणे म्हणजे राजकारण नाही, तर विकास आणि समाजसेवा हेच खऱ्या राजकारणाचे उद्दिष्ट असायला हवे. देश बदलण्यासाठी आपल्याला ‘कर्मयोगी’ लोकांची संख्या वाढवावी लागेल.” गडकरींनी कै. लक्ष्मणराव मानकर यांच्या कार्याची आठवण करून दिली की, त्यांनी राजकारण सोडून शोषित आणि आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. आज कोणतीही सरकारी मदत न घेता १४०० शिक्षक ३२ हजार विद्यार्थ्यांना घडवत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणाचा वटवृक्ष आता संपूर्ण महाराष्ट्रात

‘कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे’ अध्यक्ष अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली आता हे शैक्षणिक कार्य विदर्भापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारले जाणार आहे. संस्थेचे ध्येय आता ५००० शिक्षक आणि १ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संस्थेच्या प्रवासाचे कौतुक केले, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचा आणि समाजसेवकांचा ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला, तसेच नवनियुक्त राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते यांचाही सत्कार करण्यात आला.