मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र (School Education Department Maharashtra) च्या या निर्णयामुळे शासकीय, अनुदानित तसेच खासगी सर्व शाळांमध्ये एकसमान नियम लागू होणार आहे.
https://prahaar.in/2026/05/02/hsc-result-2026-12th-result-2026-announced-89-79-students-pass-in-the-state-konkan-wins-again/
कोणत्या कागदपत्रांवर दिसणार आईचे नाव?
विद्यार्थ्यांच्या हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (LC), प्रवेश-निर्गम नोंदी तसेच इतर सर्व शालेय कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्यपणे नमूद केले जाणार आहे.
विशेष प्रकरणांसाठी तरतूद :
https://prahaar.in/2026/05/02/extremely-severe-alert-extremely-severe-alert-on-mobile-indian-government-tests-new-disaster-alert-system-know-the-real-story/
अमलबजावणी कशी होणार?
शाळांना त्यांच्या विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. नव्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम तात्काळ लागू होईल, तर जुन्या विद्यार्थ्यांच्या नोंदी टप्प्याटप्प्याने अद्ययावत केल्या जातील. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक सामाजिक संदेश जाणार असून, विद्यार्थ्यांच्या ओळखीत आईच्या भूमिकेला अधिक मान्यता मिळणार आहे.