-शिवरायांचा पराक्रम पाहून प्रेक्षक भारावले
मुंबई: १ मे २०२६ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग केली आहे. महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना सर्वत्र भावलेला दिसत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ सध्या देशभरात प्रचंड चर्चेत आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई किती?
https://prahaar.in/2026/05/01/salman-khan-cameo-in-raja-shivaji-goes-viral-fans-cheers-as-superstar-makes-epic-entry-as-jiva-mahala/
ॲडव्हान्स बुकिंगमधूनच मिळाला होता इशारा
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘राजा शिवाजी’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ₹५.१४ कोटी ग्रॉस कमाई केली होती. त्यात मराठी व्हर्जनचा वाटा सुमारे ₹३.६० कोटी इतका होता. त्यामुळे ओपनिंग दमदार होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने जुन्या विक्रमांना टाकलं मागे
पहिल्या दिवसाच्या कमाईत या चित्रपटाने ‘सैराट’ आणि ‘टाईमपास २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. त्या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी सुमारे ₹३.६० कोटी कमावले होते. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधूनही सुमारे ₹३.३५ कोटींची भर पडल्याने एकूण कमाईने ₹१० कोटींचा टप्पा सहज पार केला.
https://prahaar.in/2026/05/01/the-grand-finale-of-bigg-boss-marathi-season-6-became-the-highest-rated-event-of-2026/
‘राजा शिवाजी’ मध्ये बॉलीवूड सितारे संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, अमोल गुप्ते तर मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, आणि जेनेलिया देशमुख अशी दमदार स्टारकास्ट आहे. याशिवाय बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा खास केमिओही सध्या प्रचंड चर्चेत आहे.