मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला. पर्यटकांनी भरलेली नर्मदा क्रूझ नौका खमरिया टापूजवळ असंतुलित होऊन बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आजींची १०-१२ जण बेपत्ता आहेत.
https://prahaar.in/2026/04/30/qatar-warns-us-iran-over-strait-of-hormuz/
https://prahaar.in/2026/05/01/weather-update-next-48-hours-very-important-relief-from-heat-but-new-crisis-of-unseasonal-weather-at-the-door-imds-high-alert/
View this post on Instagram
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक :
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.सरकारने जाहीर केले आहे की, बचावकार्याला पूर्ण गती देण्यात आली असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.