Home ब्रेकिंग न्यूज Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र
Sharad Pawar

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या आणि पवार कुटुंब राजकारणामुळे विभक्त होण्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम देत आज शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.

पवार कुटुंबाच्या भेटीचे कारण काय ?

या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य या स्नेहभोजनसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार सध्या पुण्यातील मोदीबागमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र भेटणार आहेत. कौटुंबिक आणि राजकारणातील अनेक घडामोडी सध्या पवार कुटुंबात घडत आहेत. रेवती सुळेचं लग्न शिवाय रोहित पवार, जय पवार यांची आगामी निवडणुकांविषयी वक्तव्य या पार्श्वभूमीवर हे स्नेहभोजन होत आहे.

https://prahaar.in/2026/04/28/pakistan-will-break-a-sweat-russia-has-given-big-good-news-to-india-soon/

सुनेत्रा पवार आणि जय, पार्थ पवार राहणार उपस्थित ?

‘पवार विरुद्ध पवार’ अशा संघर्षांला तोंड फुटत असताना पवार कुटुंबीयांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. सायंकाळी ५ वाजता मोदीबागेत पवार कुटुंब हजर राहणार असून, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत, सुनेत्रा पवार जाणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जय पवार बाहेर असल्याने या कार्यक्रमाला अनुउपस्थित राहू शकतात अशा चर्चा आहेत.

https://prahaar.in/2026/04/28/pratap-sarnaik-new-formula-regarding-mandatory-marathi-for-rickshaw-and-taxi-drivers/

कौटुंबिक की राजकीय भेट ?

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोलावलेली ही भेट कौटुंबिक असून कोणताही राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या स्नेहभोजनाला कोण उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.