– केशव महाराजला मिळणार संघात स्थान
आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली संघाला सात सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळाले असून पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. खराब फॉर्मसोबतच दुखापतींच्या समस्यांनीही संघाची डोकेदुखी वाढवली आहे.
संघासाठी मोठा धक्का म्हणजे सलामीचा आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील तीन सामन्यांपासून दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरही खांद्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबईने त्याला २ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते, मात्र त्याने या हंगामात फक्त चार सामने खेळून पाच विकेट्स आणि काही धावा केल्या.
https://prahaar.in/2026/04/27/what-is-going-on-in-the-ipl-the-team-that-scored-264-runs-just-two-days-ago-has-been-bowled-out-for-75/
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संपूर्ण हंगाम पाहता फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात सातत्याचा अभाव दिसून येत आहे. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली संघाचा समतोल बिघडल्याची चर्चा सुरू आहे. संघाच्या प्रमुख फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे सामने हातातून निसटत गेले आहेत.
https://prahaar.in/2026/04/27/ipl-2026-whats-up-rinku-singh-breaks-mahendra-singh-dhonis-record-after-15-years/
आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला उर्वरित सात सामन्यांपैकी किमान सहा सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक सामना “करो या मरो” असा ठरणार आहे.
मुंबईचा पुढील सामना २९ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध होणार असून, या सामन्यात संघ पुनरागमन करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.