ठाणे : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखद आणि गारेगार होणार आहे. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या योजना या राबवल्या जात असतात. मेट्रो, बुलेट ट्रेन यानंतर आता पॉड टॅक्सी धावणार आहेत.
पॉड टॅक्सिचा अहवाल
मुंबई आणि उपनगरात लोकसंख्या वाढते आहे आणि याचा परिणाम म्हणून मुंबईतील वाहतूक सुविधा या अपुऱ्या पडत चालल्या आहेत. त्यामुळे पॉड टॅक्सिची संकल्पना राबवत सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर राबवले जाणार आहे. राज्य सरकार MMRDA सोबत मिळून या या प्रकल्पाच काम करणार आहे.
https://prahaar.in/2026/04/27/nashik-the-unexpected-happened-while-looking-at-a-mobile-phone-a-young-man-fell-straight-down-from-the-fourth-floor/
या ठिकाणी उभारली जातील स्थानक
ठाणे पॉड टॅक्सी शहरातील माजीवाडा, विवियाना / लेक शॉवर मॉल, मानपाडा, हिरानंदानी इस्टेस्ट, कासारवडवली, तीन हात नाका आणि शास्त्री नगर या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. ठाण्यातील पॉड टॅक्सीमुळे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार असून या प्रकल्पासाठी एकूण २.८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ४३.५ किमी मार्गावर तब्बल ७२ स्थानक बांधली जाणार आहेत.
https://prahaar.in/2026/04/27/raghav-chaddha-approval-for-merger-of-those-7-aap-mps-including-raghav-chaddha-into-bjp/
तर मीरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सिचे एकूण २९ स्थानकं असतील. २,२५६ कोटी रुपयांचा कजरच अपेक्षित असून ३२.५ किमी लांबीचा हा मार्ग आहे. मीरा रोड, भाईंदर, काशिमीरा, गोल्डन नेस्ट सर्कल, शांती पार्क, कनकिया आणि इतर रहिवासी ठिकाणांना जोडणार आहे.
पॉड टॅक्सिची क्षमता किती असते
ही पॉड टॅक्सी एलिव्हेटेड मार्गावर धावणार असून प्रत्येक टॅक्सी सेल्फ स्टिअरिंग प्रणाली असणार आहे. यात १६ – २० प्रवासी क्षमता असून ताशी ६० ते ७० किमी वेगाने प्रवास करू शकते.