Home ब्रेकिंग न्यूज Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल
Ambernath LocaL

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होते. असाच ठाणे ते डोंबिवली स्थानकांदरम्यान ट्रेनमधल्या महिलांच्या मारामारीच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडल?

ही घटना रविवारी संध्याकाळची असून ऐन गर्दीच्या वेळी घडली आहे. CSMT ते अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. महिला डब्ब्यांमध्ये चढत होत्या, परंतु एक मुस्लिम महिला प्रवासी बाजूलाच व्हायला तयार नव्हती त्यामुळे बाकीच्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढायला मिळत नव्हते , त्रास होत होता. लोकल स्थानकावरून सुटली तरीही हा वाद सुरु होता, त्यात ठाणे स्थानक सुटल्यानंतर एक महिला प्रवासी ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल मधून रेल्वे रुळावर पडली. त्यानंतर वाद आणखीच चिघळला.

https://prahaar.in/2026/04/27/pratap-sarnaik-marathi-is-mandatory-for-rickshaw-and-taxi-drivers-transport-ministers-firm-stand-what-happened-in-todays-meeting/

‘बाजूला सरका’ किंवा ‘जागा द्या’ असे म्हटल्यानंतर मुस्लिम महिलेला राग आला त्या महिलेने थेट इतर प्रवाशांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्या महिलेने इतर महिलेचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. इतर महिला त्यात पडल्या असता ती कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

https://prahaar.in/2026/04/27/food-poisoning-shocking-incident-in-mumbai-four-members-of-the-same-family-die-due-to-poisoning/

रेल्वे पोलिसात तक्रार

ट्रेनमधील हा मारामारीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. शिवाय रेल्वे पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे महिलेचा शोध घेत आहेत.