कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला सामन्यादरम्यानच्या त्याच्या आक्रमक वर्तनाबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आणि यष्टीरक्षक अंगक्रिश रघुवंशीला, सामना क्रमांक ३८ मध्ये आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी त्याच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.” त्यात पुढे म्हटले आहे की, त्याने कलम २.२ चे उल्लंघन केले, जे सामन्यादरम्यान उपकरणे किंवा मैदानातील साहित्याच्या गैरवापराशी संबंधित आहे.
https://prahaar.in/2026/04/27/ipl-2026-angkrish-raghuvanshi-wicket-in-controversy-what-does-obstruction-in-fielding-mean/
https://prahaar.in/2026/04/27/sebastian-sawe-marathon-record-in-just-two-hours-sebastian-shaws-historic-feat/
ही घटना सामन्याच्या पाचव्या षटकात घडली, जेव्हा रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद देण्यात आले. या निर्णयानंतर, त्याचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या बॅटने सीमारेषेवरील कुशनवर प्रहार केला. इतकेच नाही, तर त्याने आपले हेल्मेट डगआऊटच्या दिशेने फेकले, जे आयपीएलच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे.