– भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेचे स्टॉल्स जर अविवाहित व्यक्तीला दिले असतील तर ते स्टॉल्स संबंधित व्यक्तीच्या आई वडिलांच्या नावे केले जातील, परंतु कोणत्याही परिस्थिती भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.
https://prahaar.in/2026/04/26/deputy-chief-minister-shinde-inspects-missing-link-project-inauguration-scheduled-for-maharashtra-day-mumbai-pune-expressway-ghat-to-get-a-bypass/
यावर प्रशासनाच्यावतीने माहिती देताना, स्टॉल्सचा परवाना हा स्टॉल्सधारकाला स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत परवान्यांचे हस्तांतरण हे कायदेशीर वारसा नावाने सांगण्यात येते. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवान्यांचे हस्तांतरण हे स्टॉल्सधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ असल्यास त्यांचे कायदेशीर नवरा, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे करण्यात येते. पण परवानाधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ झाल्यास नमुद केलेले वारस नसल्यास त्यांच्या आई, वडिलांच्या नावे करण्यासाठीचे परिपत्रक माहपालिकेच्यावतीने बनवून आयुक्तांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात आले आहे. त्यामुळे अविवाहित परवानाधारकांची बहिण व भाऊ यांच्या या धोरणात अंतर्भाव करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.