रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत संपण्याचे नाव घेत नाही आहे. जमीन खरेदी विक्रीचे अनेक घोटाळे बाहेर येत असून खरातची कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उरणमध्ये जमीन खरेदी
भोंदू बाबा अशोक खरात याने उरणमधेही जमीन खरेदी केली असल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय दराने खरेदी केली असली तरी यात अडीच ते तीन कोटींचा व्यवहार झाला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय या २० गुंठे जमिनीची केवळ ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे.
https://prahaar.in/2026/04/23/nashik-nashik-what-happened-in-ashok-kharats-hearing-today-the-departure-of-the-impostor-kharat-is-now/
कल्पना खरातच्या नावावर करोडोंचा घोटाळा
कल्पना खरातच्या नावावर उरण चाणजे महसूल हद्दीतील सर्वे नं. ३७१ / ३८ मध्ये २० गुंठे जमीन ५८ लाख ५० हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहे. त्याची नोंदणी १२ मार्च २०२६ रोजी केली. त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार मंजुरी आणि कल्पना खरातच्या नावाने सातबारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
चाणजे महसुली हद्दीतील करंजा मच्छिमार बंदर, करंजा- रेवस सागरी सेतू, रो- रो सेवा यामुळे या परिसरातील जागा, जमिनींचे भाव आकाशाला भिडले आहेत. येथील जमिनीचा प्रतिगुंठा १४ ते १५ लाखांपर्यंत खरेदी- विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
https://prahaar.in/2026/04/23/1019533nashik-crime-doctor-who-provided-abortion-pills-to-a-fake-kharat-on-radar/
सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
सिन्नर तालुक्यात देखील अशोक खरात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इथल्या पतसंस्थेत खरातची ३२ खाती आहेत. तसेच फिर्यादीच्या खात्यातून ५७ लाख ९० हजार ९७९ चा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणात आणखी गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.