Home ताज्या घडामोडी BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

0
BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी
Prabhakar Shinde BMC Standing Committee Chairman

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु असतानाच नागरिकांची प्रचंड त्रास सहन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने आता स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे गोरेगाव गोकुळधाममधील रस्ते कामांसह इतर भागांमधील रस्ते कामे तसेच इतर प्रकल्प कामांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुंबईत सध्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून १५ एप्रिल नंतर कोणतेही खोदकाम करू नये अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. नागरिकांना सेवा देताना त्यांना गैरसोय निर्माण करण्याचा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यातच स्थायी समितीच्या बैठकी भाजपच्या नगरेसेविका प्रिती सातम यांनी गोरेगाव पूर्व येथील गोकुळधामधील साई कुटीर मार्ग,यशोधाम आदी रस्त्यांची कामे सुरु असून या रस्त्यांच्या कामांमध्ये योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याने आपण स्वत: या रस्ते कामांची पाहणी करावी अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी गोकुळधाममधील रस्ते कामांची पाहणी केली जाईलच, याबरोबरच अन्य नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये अशाप्रकारच्या समस्या असतील आणि त्यांच्या तक्रारी असतील तर त्याठिकाणीही भेटी देवून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत पावसाळ्यापूर्वी या सर्व रस्त्यांची तसेच प्रकल्पांची कामे व्यवस्थित करण्यास भाग पाडले जाईल,असे स्पष्ट केले.