Home ब्रेकिंग न्यूज Mallikarjun Kharge : मोदींना म्हणाले दहशवादी; खर्गेंची जीभ खरंच घसरली की राजकीय डाव?

Mallikarjun Kharge : मोदींना म्हणाले दहशवादी; खर्गेंची जीभ खरंच घसरली की राजकीय डाव?

Mallikarjun Kharge : मोदींना म्हणाले दहशवादी; खर्गेंची जीभ खरंच घसरली की राजकीय डाव?
mallikarjun and narendra modi

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना दहशतवादी असा उल्लेख केला असून भाजपने आक्रमक भूमिका घेत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.

देशातील स्त्रियांच्या हक्काचा आणि सन्मानाचा निर्णय मोदी सरकारने होता. संसदेत नारी शक्ती वंदन हे विधेयक मांडण्यात आले, हे विधेयक विरोधकांनी पाडले, यावरून पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना जागृत करत, विरोधकांना यांना खडेबोल सुनावले, विरोधकांचे कान उपटले.

https://prahaar.in/2026/04/21/struggle-will-not-cease-until-33-percent-reservation-for-women-is-secured-in-parliament-of-india/

देशात काही ठिकाणी सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजपचे बडे नेते विविध राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अण्णाद्रमुकशी युती केली आहे . त्यावरून चेन्नईतील पत्रकार परिषदेत खर्गे यांनी पंतप्रधानांवर बोलताना त्यांची जीभ घसरली ‘अण्णाद्रमुकचे लोक त्यांच्या प्रचारफलकांवर अण्णादुराई यांचे फोटो लावतात. ते मोदींबरोबर कसे जाऊ शकतात? ते दहशतवादी आहेत असे खर्गे म्हणाले.

पत्रकारांनी दहशवादी या मुद्द्यावरून खर्गे यांना धारेवर धरले असता खर्गे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपला बोलण्याचा अर्थ सांगत मोदी दहशतवादी आहेत असे मी म्हणालो नाही .

काँग्रेसचा कट

भाजपने देखील यावर जोरदार टीका करत मल्लिकार्जुनच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ही बोलण्यातील चूक नसून जाणूनबुजून केलेला कट आहे, काँग्रेस हा शहरी माओवाद्यांचा पक्ष असून या या पक्षाचा रिमोट कन्ट्रोल राष्ट्रदोही लोकांच्या हातात आहे अशी जळजळीत टीका भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी आणि संबित पात्रा यांनी केली आहे.

https://prahaar.in/2026/04/21/at-the-baramati-rally-the-chief-minister-lauded-ajit-pawars-work-and-campaigned-vigorously-for-sunetra-pawar/

काँग्रेसने माफी मागावी

खर्गे यांनी केवळ पंतप्रधान मोदींचा अपमान केला नसून त्यांनी संपूर्ण १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर माफी ,लागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.