मुंबई : महाराष्ट्र अनेक पावसाच्या सारी कोसळत आहेत, कुठे गारपीठ तर कुठे सोसाट्याचा वारा आणि वीज, शिवाय भारतीय हवामान विभागाने आणि महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल या याकाळात मुंबईसह इतर शहरात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सारी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजा पडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे अति उष्णता वाढणार आणि एकीकडे मुसळधार पासून कोसळणार यामुळे महाराष्ट्रावर संध्या दुहेरी संकट उध्दभवले आहे.
या शहरात पावसाची हजेरी
सूर्याचा प्रकोप वाढला असून तापमान पार ४५ अंशापर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे मुंबईसह , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे ढग जमा झाले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईला मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आला आहे. राज्यातील हवामानात झालेल्या बदलांमुळे ट्रफ ‘रेषा महाराष्ट्र आणि आसपासच्या भागातून जात आहे याचा परिणाम म्हणून पुढील ३ तासांत मुंबईसह, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे डहाणू पालघर परिसरात तसेच गुजरात किनारपट्टीलादेखील पावसाची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/04/19/maharashtra-weather-alert-unseasonal-heavy-rains-in-maharashtra-on-sunday-alert-issued-for-these-districts/
बदलापूरमध्ये पावसाची हजेरी
आज सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेय पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. दोन दिवसापासून बदलापूर आणि ग्रामीण भागात पारा ४० अंशापर्यंत गेला आणि आज पावसाने हजेरी लावली.
नागरिकांची तारांबळ
वातावरणात होणाऱ्या हा बदलामुळे कडक उन्हाळ्यात नागरिकांना काही काळ थंडावा मिळणार असून ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे नागरिकांनी तारांबळ उडणार आहे हे निश्चित त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/04/16/maharashtra-weather-heatwave-to-intensify-in-maharashtra-while-showers-are-set-to-lash-these-states/
पुढील ४ दिवस या भागात जोरदार पावसाची शक्यता
नवीन वेस्टर्न डिस्टर्ब मुळे महाराष्ट्रासह कर्नाटकाच्या अंतर्गत भागात पावसाच्या हालचाली वहडणार आहेत भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० ते २४ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि कोकण विभागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या उपाययोजना
ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी
रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत
शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात
हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावतळीपर्यंत त्वरित पोहोचवावे
या ठिकाणी पडणार मुसळधार
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नसिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोळोआयर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
या ठिकाणी येणार हिटव्हेव
अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर