Home ब्रेकिंग न्यूज Japan Earthquake – tsunami : जपानमध्ये दुहेरी नैसर्गिक संकट! ७.४ तीव्रतेच्या भूकंपानंतर ८० सेंटीमीटर त्सुनामीची धडक; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Japan Earthquake – tsunami : जपानमध्ये दुहेरी नैसर्गिक संकट! ७.४ तीव्रतेच्या भूकंपानंतर ८० सेंटीमीटर त्सुनामीची धडक; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

0
Japan Earthquake – tsunami : जपानमध्ये दुहेरी नैसर्गिक संकट! ७.४ तीव्रतेच्या भूकंपानंतर ८० सेंटीमीटर त्सुनामीची धडक; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Japan Earthquake - tsunami

सोमवारी जपानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने Japan Meteorological Agency (JMA)ने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर इवाते प्रांताजवळ समुद्रात होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४:५३ वाजता या भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवली.

या भूकंपाचे धक्के केंद्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या टोकियो पर्यंत जाणवले. टोकियोमधील उंच इमारती हलल्या, तर अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र कंप जाणवले. सध्या मोठ्या प्रमाणात जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नसली, तरी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, क्योडो वृत्तसंस्थेनुसार, टोकियो-आओमोरी बुलेट ट्रेन मार्गावरील सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/04/20/we-will-teach-a-lesson-to-those-who-trample-upon-womens-rights-and-launch-a-statewide-agitation-to-expose-the-true-faces-of-our-opponents-says-cm-devendra-fadnavis/

एकीकडे भूकंप तर दुसरीकडे त्सुनामीचे संकट :

भूकंपानंतर उत्तर जपानमधील एका बंदरावर ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंचीची त्सुनामी लाट धडकली. जेएमएने सांगितले की, इवातेमधील कुजी येथील बंदरावर सायंकाळी ५:३४ वाजता (०८३४ जीएमटी) ही लाट दिसून आली. यापूर्वी सायंकाळी ५:३२ वाजता ७० सेंटीमीटर उंचीची लाट धडकल्याचे सांगण्यात आले होते.
त्सुनामीच्या सर्वात आधीच्या लाटा उत्तरेकडील किनारपट्टीवर तात्काळ पोहोचू शकतात, असे हवामान संस्थेने म्हटले आहे.

NHKच्या वृत्तानुसार, काही किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा आधीच नोंदवण्यात आल्या आहेत. हवामान संस्थेने इशारा दिला आहे की, लाटा वारंवार येऊ शकतात, त्यामुळे अधिकृत इशारा मागे घेईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाण सोडू नये.