Home ब्रेकिंग न्यूज Women’s Reservation Bill : द्रमुक आणि काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Women’s Reservation Bill : द्रमुक आणि काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

0
Women’s Reservation Bill : द्रमुक आणि काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Amit Shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्रमुक आणि काँग्रेसवर महिला आरक्षण विधेयकाबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, या दोन्ही पक्षांनी संसदेत महिलांना सक्षम करणारे महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इरोड जिल्ह्यातील मोडक्कुरिची मतदारसंघात भाजप उमेदवार कृतिका यांच्या प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांचा रोडशो शिवगिरी शासकीय रुग्णालय परिसरातून सुरू होऊन थिरुन चिन्नमलाई यांच्या पुतळ्याजवळ संपला.

https://prahaar.in/2026/04/19/start-kamgar-hospital-in-andheri-at-full-capacity/

अमित शाह यांनी आपल्या भाषणात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, एम. करुणानिधी यांच्यापासून सुरू झालेली घराणेशाही आजही सुरू असून स्टॅलिन आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

https://prahaar.in/2026/04/19/public-itself-will-finish-off-the-congress-raut-should-worry-about-his-own-party-says-navnath-ban/

तसेच, एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमध्ये मजबूत आघाडी उभी राहत असल्याचा दावा शाह यांनी केला. राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यास भ्रष्टाचार संपुष्टात येईल आणि तामिळनाडूची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.