Home क्रीडा Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत

Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत

Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; आयुष म्हात्रेला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत
aayush mhatre

हैदराबाद : चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी युवा फलंदाज आयुष म्हात्रेच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले केली की, आयुषची हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर असल्याचे दिसते.

शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नईच्या सामन्यादरम्यान आयुषला धावताना त्रास झालेला दिसला. उत्कृष्ट फलंदाजी करताना, म्हात्रेने १२ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या होत्या, पण दोन धावांसाठी धावताना तो थांबला आणि त्याला वेदना होत असल्याचे दिसत होते. त्याला मैदानावरच तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती.

https://prahaar.in/2026/04/19/ipl-2026-hyderabad-defeats-chennai-by-10-runs/

मैदानावर उपचार मिळाल्यानंतर, म्हात्रेने खेळणे सुरू ठेवले आणि जवळजवळ लंगडत एक धावही घेतली. त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोरदार फटका मारला, जिथे हेनरिक क्लासेनने एक उत्कृष्ट झेल घेतला.

पराभवानंतर, सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ” आयुषची दुखापत किती गंभीर आहे हे मला माहीत नाही. आम्ही त्याला उद्या किंवा परवा स्कॅनसाठी घेऊन जाऊ.” ते पुढे म्हणाले, “मला पूर्ण खात्री नाही, पण हो, दुर्दैवाने, दुखापत खूप गंभीर दिसत आहे आणि त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी खूप मोठे नुकसान असेल, कारण तो आमच्यासाठी खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता.”

https://prahaar.in/2026/04/19/ajit-agarkar-will-chief-selector-ajit-agarkar-receive-an-extension-until-june-2027/

हसी म्हणाला, “तो एक उत्कृष्ट तरुण प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, पण यामुळे दुसऱ्या क्रिकेटपटूला संधी मिळेल. ही गोष्टच मुळात उत्साहवर्धक आहे. आमच्याकडे काही खूप चांगले क्रिकेटपटू आहेत ज्यांना अजून संधी मिळालेली नाही. आता, त्यांच्यापैकी एकासाठी ही एक उत्तम संधी असेल.”

फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “आयुषला गमावल्याबद्दल आम्ही खूप निराश आहोत. तो किती काळ संघाबाहेर राहील हे मला माहीत नाही, पण एका नवीन क्रिकेटपटूला ही संधी मिळणे तितकेच उत्साहवर्धक आहे.”

हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्स ८ गडी गमावून केवळ १८४ धावाच करू शकली. चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना २३ एप्रिल रोजी मुंबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.