Home ब्रेकिंग न्यूज Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?
Fighter Jet Emergency Landing Pune

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे लँडिंग झाले आणि अचानक संपूर्ण रनवे च बंद करण्यात आला. सुदैवाने मोठा अपघात होता होता टळला.

नेमकं काय घडलं

पुण्याचा विमानतळ हवाई दल आणि नागरी विमानांच्या वापरासाठी वापरला जातो. शुक्रवारी रात्री १०.२५ च्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचे पुण्याच्या विमानतळावर हार्ड लँडिंग झाले. विमानाच्या गिअर यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, यामुळे विमानाला मोठा धक्का बसला. विमान धावपट्टीला घासले आणि मोठी आग लागली . सुदैवाने वैमानिक सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेलं नाही.

https://prahaar.in/2026/04/17/strait-of-hormuz-open-to-all-irans-announcement-during-israel-lebanon-ceasefire-period/

केंद्रीय हवाई मंत्री काय म्हणाले?

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावरील धावट्टीवरील कामकाज थांबवण्यात आल्याची पुष्टी केली. एक्स वर पोस्ट करताना मोहोळ म्हणालेत की, “सुदैवाने विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही विमान कंपन्यांना माहिती देण्यात आली असून धावपट्टीवरील कामकाज पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात यावी यासाठी मी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

https://prahaar.in/2026/04/17/from-metro-tunnels-and-pod-taxis-to-affordable-housing-thane-is-transforming-into-a-super-city/

भारतीय हवाई दलाने एक्स वर पोस्ट करत सांगितले आहे की , ‘ भारतीय दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याने शक्य तितक्या लवकर धावपट्टी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.