पंजाब सरकारने आम आदमी पक्षाचे माजी खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सुरक्षा काढून घेतली आहे. आम आदमी पक्षाने अलीकडेच एक मोठा संघटनात्मक बदल करत, आपले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी डॉ. अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता राघव चड्ढा यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, केंद्र सरकार राघव चड्ढा यांना सुरक्षा पुरवणार आहे.
https://prahaar.in/2026/04/16/mumbai-is-facing-a-water-crisis-will-there-be-a-10-water-cut-from-may-1/
https://prahaar.in/2026/04/16/nashik-mnc-forced-conversion-case-7-people-arrested-in-womens-torture-and-conversion-case-main-mastermind-nida-khan-absconding/
यापूर्वी, २ एप्रिल रोजी आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला असेही कळवले की, चड्ढा यांना यापुढे पक्षाच्या कोट्यातून बोलण्याचा वेळ दिला जाणार नाही. या निर्णयामुळे चड्ढा आणि पक्ष नेतृत्व यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.