– राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करून दिली संपूर्ण जगाला माहिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वरून एक मोठा दावा करत आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. अमेरिकन सैन्याने इराणच्या नौदलावर मोठा हल्ला करून तब्बल १५८ नौसैनिक जहाजे नष्ट केल्याचे (Iran-US-Israel War) ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ?
https://prahaar.in/2026/04/14/mumbai-shaken-death-scare-at-live-concert-2-students-die-due-to-drug-overdose/
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या समुद्री व्यवहार संस्थेच्या प्रमुखांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये जहाजांची हालचाल थांबवण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार “निर्दोष मार्गक्रमण” हा प्रत्येक देशाचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. (Iran-US-Israel War)