डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. निशांत राजेश ठाकरे (रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह पर्यटनासाठी कोकणात आला होता.
https://prahaar.in/2026/04/14/ipl-2026-srh-vs-rr-vidarbhas-praful-hinge-wreaks-havoc-hyderabad-succeeds-in-stopping-rajasthans-victory-streak/
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७:१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ समुद्रकिनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निशांतच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनाऱ्यावर पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा करण्यात येत आहे.