Home ब्रेकिंग न्यूज Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Asha Bhosle : आज स्वर शांत झाले, स्वर समाधी; सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
asha bhosle

मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रात्रभर उपचार सुरु होते आणि रविवारी सकाळी अचानक त्यांची प्राणज्योत मावळली, सूर सम्राज्ञी शांत झाली.

https://prahaar.in/2026/04/13/asha-bhosle-music-academy-asha-bhosle-music-academy-to-be-established-in-mumbai/

सिने-सृष्टी हळहळली

आधी लता दीदी आणि आता आशा ताई मंगेशकर घराण्यांचे दोन हिरे, दोन स्वर शांत झाले. त्यामुळे संपूर्ण चाहत्यांमध्ये सेलेब्रिटींमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळी ११ वाजता आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँड लोअर परेल येथील निवास्थानी ठेवण्यात आले होते. आशा ताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला महाराष्ट्रातील नेते मंडळींसह अनेक दिग्गज कलाकार खेळाडू यांनी अंतिम संस्कारात आपली उपस्थिती लावली.त्यांच्या घरापासून ते शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. शासकीय इतमामात शिवाजी पार्कमध्ये आशा ताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ही नेते मंडळी आशा ताईंसोबत शेवटच्या क्षणी होती उपस्थित

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप नेते आशिष शेलार, उबाठाचे उद्धव ठाकरे सहकुटुंबीय आशा ताईंना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/04/13/raja-shivaji-the-film-industry-is-plunged-into-mourning-following-the-passing-of-asha-bhosle-riteish-takes-this-major-decision-regarding-the-film-raja-shivaji/

सिने -सृष्टी कलाकार

रितेश देशमुख, तब्बू, विकी कौशल, राकेश रोशन, अनुराधा पौडवाल, नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, हेलन, रणवीर सिंग, आमिर खान, सचिन पिळगावकर, सुशांत शेलार तसेच क्रीडा विश्वातून देखील सपत्नीक सचिन तेंडुलकर , मोहम्मद सिराज या खेळाडूंनी आशा ताईंना वाहिली श्रद्धांजली