Home देश Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी
Ahmdabad dosa batter death

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याप्रकरणी परिवारानं डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याचा दावा केला होता. कुटुंबातील चौघा सदस्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं, तर मुलींचे वडील विमल प्रजापती यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दीर्घकाळ कसून चौकशी करण्यात आली.

पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी), पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एका पथकानं मुलींच्या वडिलांची एका तासाहून अधिक काळ चौकशी केली. तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्यानंतर आरोपीला कोणत्याही क्षणी औपचारिकरित्या अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुलींसह पालकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ‘ॲल्युमिनियम फॉस्फेट’ आणि ‘जस्त’ (झिंक) हे प्रमाणाबाहेर असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याची शक्यता संपुष्टात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलनं आपल्या २ मुलींच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच ‘सेल्फोस’ (Celphos) हे धान्य साठवणुकीत वापरलं जाणारं उंदीरनाशक खरेदी केलं होतं. दोन्ही मुलांच्या शवविच्छेदन अहवालांची प्रतीक्षा असून त्यात मोठा उलगडा होऊ शकतो.

साधारणपणे, ‘सेल्फॉस’ गोळ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ असतं, हा एक अत्यंत विषारी पदार्थ आहे. “विमल प्रजापतीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, २७ मार्च रोजी त्यांनी सेल्फॉसची १० पाकिटे खरेदी केली होती. त्यांनी घरातील साठवून ठेवलेल्या गव्हाजवळ सेल्फॉसची ८ पाकिटं वापरली होती आणि आता आम्ही उर्वरित २ पाकिटांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.”

प्रजापती कुटुंबाच्या घरात एक पर्सनल डायरी सापडली असून त्यात भावनाच्या मनात मुलगा व्हावा, अशी तीव्र इच्छा दिसून येते. मुलगा झाल्यावर विशिष्ट मंदिरात जाऊन नवस फेडण्याचाही उल्लेख आहे. या नोंदी २०२६ वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच प्रजापती दाम्पत्याची दुसरी मुलगी राहाच्या जन्मापूर्वी लिहिल्या गेल्या होत्या.

सातत्यानं सुरू असलेल्या चौकशीवरून तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सूचित होतं. त्यामुळे आरोपीला कोणत्याही क्षणी औपचारिकरित्या अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आतापर्यंत एफआयआर दाखल केला नसून अपघाती मृत्यूच्या प्रकरणाच्या आधारे तपास सुरू आहे. याशिवाय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालाचीही प्रतीक्षा तपास पथक करत आहे. हा अहवाल शनिवारी मिळण्याची अपेक्षा असून या खटल्यात तो अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

दिवंगत राहा आणि मिश्री यांचे आजोबा गौरीशंकर, आजी कुसुम आणि भावनाचे वडील अशा काही सदस्यांना चांदखेडा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीही विमल प्रजापतीची सुमारे दीड तास चौकशी केली होती. तसेच ऑस्ट्रेलिया आणि नायजेरियाहून आलेल्या मुलींच्या मावश्यांचे जबाबही पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदवून घेतले होते.

मुलींची आई भावना प्रजापतीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक रुग्णालयात रवाना करण्यात आलं होतं, डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिची चौकशी हा या तपासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या चौकशीच्या अनेक फेऱ्या सुरू असून, महत्त्वाच्या न्यायवैद्यक अहवालांची प्रतीक्षा असल्यानं, या प्रकरणात लवकरच निर्णायक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.