नाशिक : नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या कारभारावर पोलिसांनी अखेर हातोडा टाकला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या ‘स्पेशल ऑपरेशन’मध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे.
आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य रॅकेट असण्याचा संशय :
https://prahaar.in/2026/04/08/nashik-womens-safety-issue-back-in-the-spotlight-6-accused-arrested-in-molestation-and-outraging-modesty-cases-sit-launches-investigation/
केंद्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल :
मिळालेल्या माहितीनुसार, या आयटी कंपनीत महिलांना विविध आमिषे दाखवून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे शोषण केले जात होते. या प्रकरणाचा तपास करत असताना तपासी अधिकाऱ्यांच्या हाती काही धक्कादायक पुरावे लागले आहेत, जे एखाद्या मोठ्या गुन्हेगारी साखळीकडे निर्देश करतात. यामुळेच स्थानिक पातळीवरील तपासासोबतच आता राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांनी यात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे या केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग होण्याची शक्यता असून, यामुळे नाशिकसह संपूर्ण आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.