Home ब्रेकिंग न्यूज Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले…..

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले…..

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले…..
CHATRAPTI SAMBHAJINAGAR

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत सर्वांचे लक्ष वेधून घेत घेतले आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून लोकांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://prahaar.in/2026/04/11/thane-bhiwandi-metro-line-5-likely-to-be-completed-by-january-2027/

जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

पातूर येथील नितीन कुचवरे या उमेदवाराने आर्थिक अडचणी असूनही भरती चुकू नये म्हणून चपलेवरच धावला. त्याने अवघ्या १८ मिनिटांत ५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली. नितीनची ही मेहनत पाहून SRPF कमांडंट विक्रम साळी यांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. या भरती प्रक्रियेसाठी सुमारे ७५ हजार अर्ज प्राप्त झाले असून दररोज हजारो उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. अशा मोठ्या स्पर्धेत नितीनने आपल्या जिद्दीने वेगळेपण सिद्ध केले.

https://prahaar.in/2026/04/11/mumbai-local-you-will-no-longer-be-able-to-travel-while-hanging-from-the-local-train-coming-soon/

नितीनची प्रतिक्रिया

शूज मिळाल्यानंतर नितीनने अधिकाऱ्यांचे आभार मानले. “घरची परिस्थिती कठीण असल्याने मी सॅण्डलवरच धावलो, पण माझी मेहनत पाहून सरांनी मदत केली,” असे त्याने सांगितले.

एकूणच, या घटनेमुळे कठीण परिस्थितीतही हार न मानता प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही प्रेरणादायी कहाणी ठरत आहे. मेहनत आणि जिद्द असली की मदतीचे हात आपोआप पुढे येतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.