मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग चढवत विजय मिळवला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात युवा फलंदाज मुकुल चौधरीने निर्णायक भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.
https://prahaar.in/2026/04/09/ipl-2026-bcci-announces-new-rules-for-players-who-do-not-play-matches/
मुकुल चौधरीचा सामना जिंकवणारा डाव
लखनौची अवस्था डळमळीत असताना मुकुल चौधरीने जबाबदारी घेत नाबाद 54 धावांची खेळी साकारली. केवळ 27 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने ७षटकार आणि 2 चौकार लगावत दबाव झुगारला. शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज असताना त्याने शांतपणे सामना लखनौच्या बाजूने वळवला.
बदोनीचीही साथ
मुकुलला आयुष बदोनीने चांगली साथ दिली. बदोनीने 34 चेंडूत 54 धावा करत संघाला स्थैर्य दिले. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. निकोलस पूरन, ऋषभ पंत आणि अब्दुल समद हे लवकर बाद झाले होते.
KKR कडून 181 धावांचे आव्हान
https://prahaar.in/2026/04/08/ipl-2026-rr-vs-mi-rajasthan-royals-won-3rd-consecutive-match-beat-mumbai-indians-by-27-runs-at-guwahati/
लखनौची पॉइंट टेबलमध्ये झेप
या विजयासह लखनौने सलग दुसरा विजय नोंदवत 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे KKR ला अजूनही या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एकूणच, शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनौने दबावाखालीही उत्कृष्ट कामगिरी करत विजय खेचून आणला.