महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी
मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा. यासाठी ई-कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण सक्तीचे करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशाप्रकारे अंमलबजावणी करून सक्ती केल्यास ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यायाने पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल असे विश्वास व्यक्त केला जात आहे.
या ई कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी, कार्यप्रणाली आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नेमून संपूर्ण व्यवस्थापन स्वतःकडे घेण्याचीही सूचना केली आहे. या निर्णयामुळे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही तिवाना यांनी व्यक्त केली आहे.