हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या २ वर्षे ११ महिने वयाच्या चिमुरड्याने असा काही पराक्रम केला आहे की, अवघ्या जगाचे डोळे विस्फारले आहेत. कोंडा श्रेयांश मुरली कृष्णा पटेल असे या बालकाचे नाव असून, त्याने बुद्धीबळाच्या खेळात चक्क दोन विश्वविक्रम (World Records) आपल्या नावावर केले आहेत.
विक्रमी कामगिरीचा थरार
‘रे चेस अकॅडमी’तर्फे (Ray Chess Academy) आयोजित एका विशेष कार्यक्रमात श्रेयांशने आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. त्याने केवळ १५ मिनिटे ५२ सेकंदात ९३ ‘बॅक-रँक चेकमेट्स’ सोडवले. इतक्या कमी वेळात अचूक चाली रचणे ही एक दुर्मिळ कामगिरी मानली जात आहे. एवढ्यावरच न थांबता, श्रेयांशने अवघ्या १ तास ९ मिनिटे ९ सेकंदात तब्बल २१ चेस बोर्ड व्यवस्थित मांडून दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
https://prahaar.in/2026/04/08/gautam-birhade-appointed-as-director-at-mmrcl/
आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू
ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार सन्मान
श्रेयांशची आई, कोंडा सुस्मिता पटेल यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, श्रेयांशला लहानपणापासूनच बुद्धीबळाची आवड आहे आणि परिवार त्याच्या या आवडीला पूर्ण पाठिंबा देईल. श्रेयांशला या कार्यक्रमात चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आगामी काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये (लंडन) ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तर्फे त्याला अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.