Home ताज्या घडामोडी Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Gaurav More Marrige

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता गौरव मोरे ( Gaurav More ) विवाहबंधनात अडकला आहे. गौरवनं त्याची मैत्रीण प्रियांका कारेकरसोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून लग्नाच्या शुभकार्याबरोबरच गौरवनं नवीन घरातही गृहप्रवेश केला आहे.

गौरव आणि प्रियांकाच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. गौरव मोरेची जवळची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवेनं ( Rutuja Bagwe ) या नवीन जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मिस्टर आणि मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि तुमच्या सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! तुम्हाला प्रेम आणि आनंदाने भरलेल्या दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा.”

ऋतुजाने केलेल्या या पोस्टवरून हे स्पष्ट झालं की गौरवनं केवळ लग्न केलं नाही तर आपल्या नवीन संसाराची सुरुवात नवीन घरातून केली आहे. लग्नाबरोबरच गृहप्रवेश झाल्यानं मोरे कुटुंबात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे. गौरवनं आपल्या कष्टानं मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं असून, आता या नवीन घरात प्रियांकासोबत त्यानं गृहप्रवेश केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून गौरव मोरे घराघरात लोकप्रिय असून तो अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही झळकला आहे. आता त्याच्या या नवीन प्रवासासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर या नवीन जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.