Home ताज्या घडामोडी Jalna Congress : काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

Jalna Congress : काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

0
Jalna Congress : काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

जालना : जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे. महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्ती करतेवेळी काँग्रेस नगरसेवक फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे या ७ नगरसेवकांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.