Home ताज्या घडामोडी सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा – विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा – विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर महापालिका व जिल्हा परिषदेवर भाजपचा दबदबा – विरोधी पक्षनेत्याशिवायच कारभार सुरू

सोलापूर : सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ८७ जागा भाजपने जिंकल्या असून, आठ जागा मिळविलेला एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या.

सोलापूर जिल्हा परिषदेत देखील भाजपचे सदस्य ३८ जागांवर विजयी झाले, तर राज्यातील त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महापालिकेची स्थापना १९६४ साली झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता तसेच पक्षनेतेही निवडले जात होते. मात्र, यंदा महापालिकेत पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांशिवाय कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेतही पहिल्यांदा विरोधी पक्षनेता निवडला गेला नाही.

जिल्हा परिषदांची स्थापना १ मे १९६२ रोजी गावपातळीवरील विकास व सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी करण्यात आली होती. त्यामध्ये विरोधी पक्षनेता किंवा पक्षनेते अशी पदे नव्हती; त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडायचा की नाही, हा निर्णय सत्ताधारी पक्षास म्हणजे अध्यक्षास असतो.

२००२ साली मदनसिंह मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अडीच वर्षांनंतर पक्षनेतेपद तयार करण्यात आले आणि नंतर विरोधी पक्षनेताही निवड सुरू झाली. दोन्ही पदांसाठी स्वतंत्र दालने तयार केली गेली.

आता पहिल्यांदाच भाजपला जिल्हा परिषदेवर पूर्णपणे सत्ता मिळाली असून त्यांनी पक्षनेता व गटनेता निवडले, परंतु विरोधी पक्षनेता निवडला नाही. या निर्णयामुळे आता प्रशासन कार्यान्वयनात एकपक्षीय कारभार सुरू झाला आहे.