Home ताज्या घडामोडी Dhurandhar 2 : २४ वर्षीय रॅपरची कमाल, धुरंधरमधील ‘आरी आरी’ रॅपनं जिंकली प्रेक्षकांची मने

Dhurandhar 2 : २४ वर्षीय रॅपरची कमाल, धुरंधरमधील ‘आरी आरी’ रॅपनं जिंकली प्रेक्षकांची मने

Dhurandhar 2 : २४ वर्षीय रॅपरची कमाल, धुरंधरमधील ‘आरी आरी’ रॅपनं जिंकली प्रेक्षकांची मने

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला असून सध्या धुरंधर द रिव्हेंजमधील आरी आरी या गाणांने प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेमागृहापासून सोशल मिडियापर्यंत सर्वत्र या गाण्यानं प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली असून धुरंधर २ सिनेमात हाई-एनर्जी दमदार बीट्ससह ऐकायला मिळणारं हे गाणं २४ वर्षीय रॅपर ‘डायाफी लामारे’ हिने गायले असून गायन क्षेत्रात रॅपर डायाफी लामारेला ‘Reble’ या नावानं ओळखलं जातं.

धुरंधर २ सिनेमातील हे गाणं प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलं असून हे रॅप सॉन्ग प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ऐकतं असल्याचं पाहायला मिळत आहे.

धुरंधरमधील आपल्या या हटके रॅपची प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी Rebel ही गायिका मूळची मेघालयातील जँतिया हिल्स येथील असून २०१८ मध्ये तिने आपल्या म्यूझिक करिअरिअरची सुरुवात केली. धुरंधरमधील आरी आरी या जबरदस्त रॅपची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.