Home साप्ताहिक अर्थविश्व समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

0
समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या तंत्रज्ञान-केंद्रित, नाविन्‍यता-नेतृत्वित इलेक्ट्रिक गतीशीलता कंपनीने आज आपल्‍या १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक इलेक्ट्रिक वेईकल टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्मच्‍या विकास व उत्‍पादनाची घोषणा केली. मुख्यत्वे मेक इन इंडिया दृष्टिकोनांतर्गत भारतात पूर्णपणे विकसित करण्‍यात आलेल्‍या या प्‍लॅटफॉर्ममध्‍ये इन-हाऊस डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आलेले विविध महत्त्वपूर्ण ईव्‍ही कम्‍पोनण्‍ट्स आहेत, जसे बॅटरी पॅक, बॅटरी मॅनेजमेंट सिस्‍टम (बीएमएस), मोटर, मोटर कंट्रोलर, पॉवर कंट्रोल मॉड्यूल (पीसीएम), डीसी-डीसी कन्व्हर्टर, जवळपास १५०० वॅटपर्यंत चार्जिंग क्षमता देणारे एआय-नियंत्रित ऑनबोर्ड फास्ट चार्जर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कंपनीची स्वतःच्या मालकीची ऑपरेटिंग सिस्टम. आपल्‍या इंजीनिअरिंग क्षमतांची ताकद दाखवत समर्थ ई-मोबिलिटीने महत्त्वाचे होमोलोकेशन टप्पे गाठले आहेत. कंपनीचे बॅटरी पॅक नॅट्रॅक्‍सद्वारे विक्रमी वेळेत चाचणी आणि होमोलोकेट करण्यात आले आहे. इन-हाऊस विकसित करण्‍यात आलेल्‍या कंपनीच्‍या बीएमएसची चाचणी आणि प्रमाणीकरण आयसीएटीद्वारे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हा स्वदेशी प्लॅटफॉर्म कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सला ऊर्जा देईल. लाँच करण्‍यात आलेल्‍या या प्‍लॅटफॉर्ममधून देशांतर्गत ईव्ही क्षमता निर्माण करण्याप्रती आणि ईव्ही मूल्‍य यंत्रणेमध्‍ये आयातीवरील अवलंबन कमी करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.

‘अॅडवान्‍स्‍ड टेक्‍नॉलॉजी. सिम्प्लिफाईड डिझाइन. प्रीमियम एक्‍स्‍पीरिअन्‍स’ या तत्त्वावर आधारित समर्थ ई-मोबिलिटीने गेल्या तीन वर्षांपासून गुजरातच्या कालोल येथील त्यांच्या आरअँडडी सुविधेत ईव्ही टेक्‍नॉलॉजी स्टॅक विकसित केला आहे. सखोल अभियांत्रिकी, व्‍यापक चाचणी व सतत प्रमाणीकरणाच्‍या माध्‍यमातून कंपनीने इन-हाऊस क्षमता निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्‍यामुळे विनासायासपणे हार्डवेअर-सॉफ्टवेअर एकीकरण, सुधारित सिस्‍टम कार्यक्षमता आणि विशेषत: भारतातील राइडिंग स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या इलेक्ट्रिक दुचाकींसाठी अधिक सुरक्षितता देणे शक्‍य झाले आहे.

या महत्त्वपूर्ण प्रसंगाबाबत मत व्‍यक्‍त करत समर्थ ई-मोबिलिटीचे सह-संस्‍थापक प्रियंक राखोलिया म्‍हणाले, “भारतातील ईव्‍ही परिवर्तनासाठी असेम्‍ब्‍ली-संचालित सोल्‍यूशन्‍सपेक्षा अधिक मागणी आहे. यासाठी सखोल अभियांत्रिकी, स्‍वदेशी नाविन्‍यता आणि भारतातील राइडर्ससाठी सुरूवातीपासून डिझाइन केलेल्‍या उत्‍पादनांची गरज आहे. समर्थ ई-मोबिलिटीमध्‍ये आम्‍ही गेल्‍या तीन वर्षांपासून बॅटरी सिस्‍टम्‍स व सॉफ्टवेअर आर्किटेक्‍चरपासून मोटर व पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍सपर्यंत आमचा संपूर्ण टेक्‍नॉलॉजी स्‍टॅक इन-हाऊस निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमचा इलेक्ट्रिक मोटरसायकल श्रेणीमध्‍ये प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न आहे, ज्‍याला प्रमाणित तंत्रज्ञान, पेटण्‍टेड डिझाइन्‍स आणि विश्वसनीय, उच्‍च-कार्यक्षम इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती स्‍पष्‍ट दृष्टिकोनाचे पाठबळ आहे. आम्‍ही लवकरच प्रीमियम महत्त्‍वाकांक्षी क्षेत्रात आमचा ब्रँड लाँच करणार आहोत, ज्‍यासह भारतात स्‍वावलंबी ईव्‍ही परिसंस्‍था निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होईल.”

समर्थ ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान ५१,००० किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत प्रत्यक्ष रस्‍त्‍यावर चाचणी, ३,४०० किमीपेक्षा जास्त टॉर्चर टेस्टिंग आणि विस्तृत डायनॅमोमीटर चाचण्यांसह कठोर पडताळणी प्रक्रियेतून गेले आहे. यासह भारताच्या विविध भूप्रदेशांत आणि हवामानात हे तंत्रज्ञान विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. सखोल तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाच्या आधारावर कंपनीची १०० हून अधिक सदस्यांची अभियांत्रिकी टीम या नाविन्‍यतेला चालना देत आहे. यामध्ये रेअर-अर्थ-फ्री मोटर टेक्‍नॉलॉजी आणि कंपनीची स्वतःच्या मालकीची बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (बीएमएस) विकसित करणे यांचा समावेश आहे. या तंत्रज्ञान परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी गुजरातच्या छत्राल येथे समर्थ ई-मोबिलिटीचा १,५०,००० चौरस फूटांहून अधिक जागेवर पसरलेला उत्पादन प्‍लांट आहे. या प्‍लांटमुळे दरमहा ४५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकी आणि वर्षाला ५ लाखांहून अधिक युनिट्स उत्‍पादित करण्याची क्षमता निर्माण झाली आहे, ज्यामुळे कंपनीच्‍या मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली आहे.