मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी भाजयुमो मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. संघटेनत दाखवलेली ऊर्जा, केलेले परिश्रम, पक्षनिष्ठा या सर्वाची दखल घेऊन भाजपने त्यांना नवी जबाबदारी सोपवली आहे. दीपक सिंह यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात धारावी विधानसभा क्षेत्रातील युवा मोर्चा वॉर्ड महामंत्री म्हणून केली. त्यानंतर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी मुंबई युवा मोर्चा महामंत्री पद यशस्वीरीत्या सांभाळले आणि आता मुंबई अध्यक्ष म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.