Home ब्रेकिंग न्यूज काँग्रेस, उबाठाची अट मान्य केली म्हणून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी ?

काँग्रेस, उबाठाची अट मान्य केली म्हणून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी ?

0
काँग्रेस, उबाठाची अट मान्य केली म्हणून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी ?

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे विलिनीकरण होणार नसेल तरच शरद पवारांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आली. तर विधानपरिषदेसाठी उद्धवना पाठिंबा देणार असाल तरच शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ अशी अट उबाठाकडून घालण्यात आली. काँग्रेस आणि उबाठाच्या अटी शरद पवारांच्या पक्षाने ताबडतोब मान्य केल्या. यानंतर काँग्रेस आणि उबाठाने शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा जाहीर केला, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

https://prahaar.in/2026/02/27/nationalist-congress-partys-big-announcement-regarding-parth-pawar/

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. विरोधकांनी एकी राखली तरच ते एका उमेदवाराला जिंकवून आणू शकतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मविआकडून शरद पवारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही उमेदवारी जाहीर होण्याआधी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेस आणि उबाठाने घातलेल्या अटी मान्य केल्या आहेत. यामुळे महायुतीचे सहा आणि मविआचा एक उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होईल. पण महायुतीकडून सहा ऐवजी सात उमेदवार देण्यात आले तर निवडणूक अपरिहार्य आहे.

https://prahaar.in/2026/03/04/bjp-announces-four-names-for-rajya-sabha/

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार

  1. रामदास आठवले
  2. विनोद तावडे
  3. माया चिंतामण ईवनाते
  4. रामराव वडकुते

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार

  1. पार्थ पवार

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवार

  1. ज्योती वाघमारे

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी मविआचा एकमेव उमेदवार

  1. शरद पवार