Home ब्रेकिंग न्यूज Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री फडणवीसांची ‘X पोस्ट’ चर्चेत

Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री फडणवीसांची ‘X पोस्ट’ चर्चेत

0
Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री फडणवीसांची ‘X पोस्ट’ चर्चेत

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजूपासून म्हणजेच सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. आज सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.

अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ‘X पोस्ट’ केली. “जनतेच्या अपेक्षा, विकासाचे ध्येय!” असं सूचक ट्विट फडणवीसांनी केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

जनतेच्या अपेक्षा, विकासाचे ध्येय!

महिलांचे सक्षमीकरण, उद्योगांना गती आणि बळीराजाला बळ. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया व राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आराखडा मांडणारे ‘महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६’!