“केरळमधील दहा महिन्यांची अलिन वयाने सगळ्यात लहान असलेली डोनर आहे. आपलं मूल हे आईचं काळीज असतं. मुलीच्या निधनानंतर आपलं काळीज तुटलेलं असताना एका आईनं आपल्या मुलीचं काळीज काढून देणं, हे सुदृढ समाजाचं लक्षण आहे. देहदान व अवयवदान म्हणजे ‘जिंदगी के बाद भी जिंदगी’. परंपरेतून प्रगतीकडे हे संस्थेचे ब्रीदवाक्य म्हणजे केवळ शब्द नसून संस्थेच्या कामाचा आत्मा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दान या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. आज दानाला आधुनिक विज्ञान आणि मानवतेची जोड देऊन आम्ही काम करत आहोत. आजही समाजात देहदानाबद्दल एक प्रकारचे मौन पाळलं जातं. भीती, अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतीमुळे लोक मागे सरकतात. पण हे मौन तोडणं ही काळाची गरज आहे. नेत्रदान, अवयवदान, त्वचादान आणि देहदानातून आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. दुसऱ्याच्या रूपाने जिवंत राहू शकतो.” – पुरुषोत्तम पवार