Home ब्रेकिंग न्यूज PM Modi-President Macron: पंतप्रधान मोदी- फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा! वाहतुकीत होणार मोठे बदल

PM Modi-President Macron: पंतप्रधान मोदी- फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा! वाहतुकीत होणार मोठे बदल

0
PM Modi-President Macron: पंतप्रधान मोदी- फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा! वाहतुकीत होणार मोठे बदल

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत. मॅक्रॉन यांचा हा भारत दौरा चार दिवसांचा असून, आज म्हणजेच सोमवार १६ फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन मुंबईला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असतील. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

अवजड वाहनांना बंदी:

याबाबत मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मंगळवारी (१७, फेब्रुवारी) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोल नाक्यापर्यंत अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. दोन्ही बाजूंकडील वाहतूक सामान्य वाहनांसाठी सुरू असली, तरी सुरक्षेमुळे काही ठिकाणी वेग मंदावण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते मुंबईत एका संयुक्त निवेदनाद्वारे द्विपक्षीय सहकार्यावर भाष्य करणार आहेत.

​या वाहनांना बंदीतून सूट:

– रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या

​- पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेतील सरकारी वाहने

​- अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहने

नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

राफेल करार:

शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद (डिफेन्स अक्विझिशन कौन्सिल – डीएसी) लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करणारे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) लष्करासाठी शंभरपेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने, पी-८ आय मरिटाइम पॅट्रोल आणि अंटी सबमरिन वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरिन गॅस टर्बाईन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याची तयारीत आहे.