Home ब्रेकिंग न्यूज Solapur: मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी

Solapur: मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी

Solapur: मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील निकालाचे अपडेट हाती येत असून माळशिरस तालुक्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने धक्का दिला आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचाही पराभव झाला आहे.

हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मुसंडी मारली. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला.