Home ताज्या घडामोडी मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

0
मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वध 2’च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मृणालने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चित्रपटातील दमदार अभिनय आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीचे खुलेपणाने कौतुक केले.

कंटेंट-ड्रिव्हन आणि आशयपूर्ण सिनेमांना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या मृणाल ठाकूरने ‘वध 2’च्या कलाकारांसह तांत्रिक टीमच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, ” ‘वध 2’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! प्रत्येकाची कामगिरी अप्रतिम आहे. प्रत्येक बारकाव्यात मेहनत आणि मनापासून केलेले काम दिसून येते. चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे… नक्की पाहा!”

‘वध 2’ हा समीक्षकांनी गौरवलेल्या ‘वध’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागाला त्याच्या सशक्त कथानकासह संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या प्रभावी अभिनयासाठी विशेष प्रशंसा मिळाली होती. जसपाल सिंग संधू यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा स्पिरिच्युअल सिक्वेल लव फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला असून लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये ‘वध 2’ने आधीच आपले स्थान निर्माण केले आहे.

चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली, जेव्हा 2025 मध्ये गोव्यात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)मध्ये ‘वध 2’चा गाला प्रीमियर पार पडला. या वेळी चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद आणि टाळ्यांची दाद मिळाली. यामुळे संजय मिश्रा आणि नीना गुप्ता हे भारतीय सिनेमाचे खरे आधारस्तंभ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

लव फिल्म्स प्रस्तुत ‘वध 2’ हा जसपाल सिंग संधू लिखित व दिग्दर्शित चित्रपट असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.