Home ब्रेकिंग न्यूज Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी स्वीकारणार पदभार

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी स्वीकारणार पदभार

0
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी स्वीकारणार पदभार
sunetra pawar

– मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी त्या मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक आणि औकाफ या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला त्या उपस्थित राहतील. अजित पवार यांच्या निधनामुळे या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पदभार स्वीकारण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सुनेत्रा पवार मंत्रालयानजीकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातही हजेरी लावणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिला निर्णय कोणता घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.