Home ब्रेकिंग न्यूज रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

4
रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून बऱ्याचदा पादचाऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी दादर रानडे मार्गावर घडला आहे. युटीलिटी डकच्या मॅनहोल्सजवळ योग्यप्रकारे असमांतर रस्ता बनल्याने ज्येष्ठ नागरिक ठेच लागून पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाने याप्रकरणी महापालिकेच्या जी उत्तर विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या उपचारासाठी झालेल्या सर्व खर्चाची मागणी केली आहे.

दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर शौकीन पान शॉपसमोरील डकच्या आसपास असमांतर रस्ता असल्याने त्याला पाय अडकून ७४ वर्षीय कांतीलाल देढीया हे जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागून हातही फॅक्चर झाला. महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मॅनहोल्सच्या आसपासची जागा समांतर न करता असमांतर केल्यामुळे पायाला ठेच लागून कांतीलाल देढीया हे पडले आणि जखमी झाले. त्यानंतर तेथील फळ विक्रेत्यांना बाजुला करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर देढीया कुटुंबाने त्यांच्यावर भाटीया रुग्णालयात उपचार केले.

यानंतर कांतीलाल देढीया यांनी महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन देत याबाबती तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च हा महापालिकेने आपल्याला द्यावा अशी मागणी निरव देढीया यांनी महापालिकेकडे केली आहे.. खड्डे आणि खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्यामुळे औषध उपचाराचा खर्चाची मागण करतानाच ही दुर्घटना जिथे घडली त्या रानडे मार्गाच्या त्या भागाची सुधारणा करून पादचाऱ्यांना सुरळीत चालता येईल अशाप्रकारे रस्ता बनवून दिला जावा अशीही मागणी केली आहे. यावेळी निरव यांनी वडिलांच्या उपचारासाठी झालेली सर्व रुग्णालयाची बिले तसेच औषधांची बिलेही जोडली आहेत.

………………

दादर भागातील अनेक रस्ते तसेच पदपथ हे असमांतर असल्यामुळे बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकच नाही तर अनेक जण पडत असतात. त्यातील काहीजण जखमी झाले आहेत. देढीया प्रकरणात तर हे आता त्यांच्या कुटुंबाने तक्रार केली आणि उपचाराचा खर्च मागितला म्हणून हे समोर आले आहे. पण दादरमधील प्रत्येक रस्ते आणि पदपथ हे असमांतर असल्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून सर्वच पदपथ चालण्याजोगे करावेत आणि रस्तेही. – सुनील शाह, अध्यक्ष दादर व्यापारी संघ

4 COMMENTS

  1. This situation is all over Mumbai. There is no riding quantity on all roads and thus is because there is no engineering supervision on the works actually contractor’s unskilled labourers do the work. Lady Jamshetji Road from Sena Bhavan to Mahim is the goog example

Comments are closed.