मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात असतानाच याठिकाणी मध्य प्रदेशमधील दोन तरुणांनी हे वाहनतळ ताब्यात घेवून तिथे अनधिकृतपणे कारपार्किग चालवून वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर या दोन्ही तरुणांविरोधात महापालिकेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
फोर्ट येथील डिएन रोडवरील हुतात्मा चौक येथील महापालिकेने यापूर्वी चालवण्यास दिलेले वाहनतळ संबंधितांकडून काढून तिथे निशुल्क सेवा सुरु केली होती. परंतु असे असतानाच याठिकाणी दोन व्यक्ती हे खाजगी वाहना चालकांकडून अनाधिकृतरित्या पार्कीगच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे दिसून आले. या व्यक्तींकडे व्हॅलेट टॅग नावाचे पार्किंग पावती दिसून आली. यापावतीबाबत महापालिकेच्या मुकादमांनी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याठिकाणी निशुल्क सेवा असतानाही या व्यक्तींकडून पार्कींगच्या नावाखाली प्रती तास १५० रुपये आकारले जात होते. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची वर्दी पोलिसांमध्ये दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीमध्ये हे दोन्ही तरुण १८ वर्षांचे असून पंजाब ग्रील हॉटेलसमोरील पदपथावर राहतात आणि मध्यप्रदेशमधील सतनामध्ये राहणारे आढळून आले. त्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
फक्त दख़ल नको, शिक्षा व्हायला हवी
Comments are closed.