Home ब्रेकिंग न्यूज Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; लातूर दौरा तात्पुरता बंद

Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; लातूर दौरा तात्पुरता बंद

0
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; लातूर दौरा तात्पुरता बंद

भाजप नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक बातमी समोर येत आहे. समावेश आहे. मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे त्यांना त्यांचा हेलिकॉप्टर प्रवास पुढे ढकलावा लागला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे संभाजीनगरहून लातूरला हेलिकॉप्टरने जाणार होत्या. परंतु, पायलटने तांत्रिक बिघाडाची आगाऊ तक्रार केल्याने त्यांना त्यांचा प्रवास पुढे ढकलावा लागला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेला सुरुवात केली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप मोठ्या ताकतीने उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. किनगाव गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ किनगाव येथे आज सकाळी १२ वाजता पंकजा मुंडे यांची प्रचार सभा होणार होती.

नेमकं घडलं काय ?

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. पंकजा मुंडे आज (मंगळवार ३ फेब्रुवारी) सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघणार होत्या. मात्र, उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे त्यांचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समजताच पंकजा मुंडे यांनी विमानतळावर जाण्याऐवजी हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत उड्डाण रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाकडून आता दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे.