नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण कुरापतींना अखेर भारताने आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळपासूनच भारताने इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी, बहावलपूर, सियालकोट आणि पेशावर या सात प्रमुख शहरांवर मिसाईल आणि ड्रोनच्या साह्याने जोरदार हल्ला केला. आयएनएस विक्रांतच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाने कराची पोर्टवर हल्ला करताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भारताच्या तुफानी कारवाईनंतर पाकिस्तान सरकारने संपूर्ण देशात ब्लॅकआऊट लागू केला आहे. इस्लामाबादजवळ पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटाने पाक लष्कर हादरले. पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडण्यात आली असून पाकिस्तानी पायलट भारताकडे ताब्यात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बलूच लिब्रेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या गॅस पाईपलाईनवर हल्ला करत दुहेरी संकट निर्माण केले आहे. कराचीत १५ ठिकाणी झालेल्या स्फोटांनी परिस्थिती गंभीर बनली असून, भारताने पाकिस्तानच्या AWACS (एअरबोर्न वॉर्निंग सिस्टीम)लाही पंजाबमध्ये निष्प्रभ केले आहे.
पाकिस्तानने भारताच्या जम्मू परिसरात ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रत्युत्तरात भारताने थेट इस्लामाबादवर मिसाईल हल्ला चढवला आहे. सध्या सीमांवर दोन्ही बाजूंनी तीव्र गोळीबार सुरू असून, उरी, कुपवाडा, तंगधारसह सीमावर्ती भागांमध्ये टेन्शन वाढले आहे.
भारताच्या आक्रमणाने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या संपूर्ण परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.
दिल्लीतील इंडिया गेट रिकामे करण्यात आले आहे, तर सीमावर्ती राज्यांतील शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
ही परिस्थिती युद्धाच्या दारात नेणारी असून, भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीकडे लक्ष द्यावे आणि अफवांपासून दूर राहावे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…