दिल्लीसह देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था

Share

ऑपरेशन सिंदूर नंतर घेण्यात आला निर्णय

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर’ नंतर राजधानी दिल्लीसह देशभरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विमानतळांवर, रेल्वे स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज, बुधवारी पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर एअर स्ट्राईक केला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या द्वारे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले असून स्वतः पंतप्रधान मोदी या ऑपेरेशनवर जवळून लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला यशस्वी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारताने विविध शहरांमध्ये अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि निमलष्करी दल तैनात केले आहेत.

दिल्लीमध्ये देखील ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही प्रमुख ठिकाणी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस पूर्णपणे सतर्क आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षा पथके महत्त्वाच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

17 minutes ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

26 minutes ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

49 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

1 hour ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

1 hour ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

1 hour ago