Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीथेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचललं आहे. भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना पाकिस्तानातून येणाऱ्या कोणत्याही वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट्स वा अन्य मीडिया कंटेंटचे प्रसारण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

८ मे २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या या सल्ल्यानुसार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत “मधस्थ आणि प्रकाशकांना” जबाबदार धरून भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारा कोणताही कंटेंट थेट थांबवण्याचे आदेश आहेत.

https://prahaar.in/2025/05/08/ndia-pak-tensions-jammu-air-sirens-sounded-blackout-imposed-drone-explosion-sound/

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने नमूद केलं की, भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील शासकीय व अर्धशासकीय घटकांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. हेच लक्षात घेऊन ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

नैतिक संहितेनुसार, भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था किंवा परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कंटेंटविषयी प्रकाशकांनी जबाबदारीने आणि संयमाने वागले पाहिजे, असे अधोरेखित करण्यात आले आहे.

सरकारच्या आदेशानुसार, सबस्क्रिप्शन असो वा मोफत सेवा, पाकिस्तानातून मूळ असलेला कोणताही डिजिटल कंटेंट भारतात प्रदर्शित करता कामा नये, असे सक्त निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -