Thursday, May 8, 2025
Homeदेशउत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी एम्स हृषिकेश येथे दाखल करण्यात आले आहे.

हेलिकॉप्टर एअरोट्रान्स कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर सहस्रधारा हेलिपॅड येथून उड्डाण केल्यानंतर हर्षिलच्या दिशेने येत होते. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहा प्रवासी असे एकूण सात जण होते. प्रवाशांपैकी चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्रचे रहिवासी होते. मृतांमध्ये तीन मुंबईकर आहेत.

उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानी जवळ हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नियमानुसार मृतांच्या नातलगांना आणि जखमी व्यक्तीला उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तराखंडमध्ये मागील दोन – चार दिवसांपासून वातावरण प्रतिकूल आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. वादळी वारे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.

हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची यादी

कला सोनी, ६१, मुंबई
विजया रेड्डी, ५७, मुंबई
रुची अग्रवाल, ५६, मुंबई
राधा अग्रवाल, ७९, उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी, ४८, आंध्र प्रदेश
वैमानिक रॉबिन सिंह, ६०, गुजरात

गंभीर जखमी

मस्तू भाकर, ६०, आंध्र प्रदेश

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -