मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली सुरुवातीला ज्या वेगाने चालली होती त्या वेगाला खीळ बसली असून गेले तीन सामने दिल्ली विजयापासून वंचित राहिली आहे. मागच्या सामन्यातील दिल्लीची फलंदाजी ही अत्यंत निराशाजनक होती, पावसामुळे त्यांना एक गुण मिळाला अथवा दिल्लीचा पराभव नक्कीच होता. तसेच आज दिल्ली धर्मशाळा येथे पंजाबला टक्कर देणार आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली गुणतक्त्यात १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
दिल्लीला पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे कारण मुंबई चौथ्या स्थानावर असून मुंबईच्या पुढे जायचे असल्यास आज विजय आवश्यक आहे. आजचा सामना धर्मशाळा येथे असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, असे झाले तर दोन्ही संघाना १-१ गुण मिळेल अवणि त्याचा सर्वांत जास्त परिणाम दिल्लीवर होईल. एक गुण मिळाल्यामुळे त्यांची गुण संख्या १४ होईल व गुणतक्त्यात दिल्ली पाचव्याच स्थानावर राहील.
आज पंजाबने सामना गमावला तर त्यांना जास्त काही फरक पडणार नाही ते त्याच स्थानाचर राहतील; परंतु पंजाबचा संघ हा धोका पत्करणार नाही ते सामना जिंकून गुणतक्यात अव्वल स्थान मिळवतील, असे पण पंजाबची फलंदाजी दिल्लीपेक्षा चांगली असल्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. तसेच आजची लढत अटीतटीची होणार आहे. चला तर मग रंगतदार सामन्याची मन्ना घेऊ.
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…
पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…