Friday, May 9, 2025
Homeदेशपाकिस्तानची आगळीक; जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताचाही प्रतिहल्ला; ड्रोन...

पाकिस्तानची आगळीक; जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताचाही प्रतिहल्ला; ड्रोन हवेतच नष्ट केले!

भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने बिथरून केलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने कठोर प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री जम्मू, पठाणकोट, जैसलमेर आणि पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. यावेळी पाकिस्तानचे लक्ष जम्मू विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि सीमावर्ती भाग होते. मात्र भारताची अत्याधुनिक S-400 डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आणि अनेक ड्रोन हवेतच उडवण्यात आले.

भारतीय हवाई दलाची प्रभावी कारवाई – पाकिस्तानचे तीन विमाने पाडले

या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रतिहल्ला करत जम्मूत दोन JF-17 आणि राजस्थानमध्ये एक F-16 पाकिस्तानी लढाऊ विमानं पाडली. ही माहिती पाकिस्तानच्या लष्करानेही अखेर कबूल केली आहे.

https://prahaar.in/2025/05/08/ndia-pak-tensions-jammu-air-sirens-sounded-blackout-imposed-drone-explosion-sound/

ड्रोन हल्ल्यानंतर ब्लॅकआउट

हल्ल्यानंतर जम्मू, राजस्थानच्या सीमावर्ती भागांत ब्लॅकआउट करण्यात आला. सायरन वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आलं, आणि सैन्याने संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. S-400 प्रणालीने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले.

सीमाभागात पाकिस्तानचा गोळीबार, भारताने लाहोरवर प्रत्युत्तर दिलं

गुरुवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आणि भारतातील १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केली. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरलं आहे.

JF-17 ची नामुष्कीची शेवट

JF-17 ही चीनने पाकिस्तानला दिलेली लढाऊ विमाने असून ती भारताच्या प्रत्युत्तरात निष्प्रभ ठरली. भारताशी कुरघोडी केल्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -